मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे भरली

ज्या लातूर शहराला शंभर दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या लातूर जिल्ह्यातील धरणं पावसानं भरली आहेत. यामुळे तुर्तास लातूरचा पाणी प्रश्न सुटल्यासाऱखा आहे.

Updated: Jul 31, 2016, 07:14 PM IST
मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे भरली title=

लातूर : ज्या लातूर शहराला शंभर दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या लातूर जिल्ह्यातील धरणं पावसानं भरली आहेत. यामुळे तुर्तास लातूरचा पाणी प्रश्न सुटल्यासाऱखा आहे.

लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावरील साई, नागझरी बंधारे शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे तुडूंब भरली आहेत.

लातूरकर ३ वर्षापासून दुष्काळाशी सामना करीत आहेत.  पावसाने मागच्या वर्षी दगा दिला आणि लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात वर्षभर पाणी नव्हतं. 

पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या तंट्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. 

लातूर हे कॉंग्रेसचे प्रभावक्षेत्र असल्याने युती सरकार जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पुढे आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर अखेरीस एप्रिल महिन्यात मिरजजवळ असलेल्या चांदोली धरणातून रेल्वेव्दारे पाणी पुरवठा सुरू झाला.