वसई : वसईतील वालिव गौराईपाडा इथं एका 45 वर्षीय विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चार जणांनी या महिलेवर बलात्कार करून तिला बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत नाल्यात फेकून दिलं होतं. दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती या महिलेचा मृतदेह लागला आहे.
संबंधित महिला आणि तिचा पती नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात भाजीपाल विक्रीचा व्यवसाय करत होते. रविवारी काम संपल्यानंतर ते रात्री 12 वाजल्याच्या सुमारास गौराईपाडास्थित आपल्या घरी परतले. यावेळी, अचानक चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. पतीला मारहाण करत त्यांनी महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला.
त्यानंतर ही महिला बेशुद्ध अवस्थेत असताना तिला त्यांना नाल्यात फेकून दिलं आणि तिथून पसार झाले. या घटनेची तक्रार पतीनं पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. तेव्हा तिचा मृतदेह फादरवाडी परिसरातील नाल्यात त्यांना सापडला. यासाठी वालिव पोलिसांना अग्नीशमन दलाच्या जवानांचीही मदत घ्यावी लागली.
याबाबत पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.