कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. पानसरेंच्या हत्येप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय.
समीर गायकवाड असं कटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. यानंतर समीर गायकवाडची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर येतेय. गायकवाडवर याधीही खुनासहीत बाईकचोरी, हाणामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला आज पहाटे साडे चारच्या सुमारास सांगलीमध्ये अटक करण्यात आलीय.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याच्या सांगलीतल्या घरावर छापा टाकण्यात आलाय. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय. शंभर फुटी रोडवरील मोती चौक परिसरात पोलिसांनी हा छापा टाकलाय.
या संदर्भात थोड्याच वेळात पोलीस पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत. दरम्यान, समीर गायकवाडचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न आता विचारला जातोय.
अधिक वाचा - डॉ.दाभोलकर, पानसरे यांच्यानंतर आता डॉ.कलबुर्गींची हत्या
सांगली पोलीस, कोल्हापूर पोलीस आणि एटीएसनं संयुक्तपणे ही कारवाई केलीय. अटकेनंतर समीर गायकवाडला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सत्र न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
अधिक वाचा - 'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'
हत्या प्रकरणात पहिलीच अटक
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं उचारादरम्यान ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये मुंबईत २१ फेब्रुवारी रोजी निधन झालं होतं. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यावर अज्ञात इसमांनी समोरून पाच गोळ्या झाडल्या होत्या. या प्राणघातक हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे गंभीर जखमी झाले होते.
अधिक वाचा - 'सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण'
गोविंद पानसरे यांच्यावर पाच दिवस अॅस्टर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, पुढील उपचार मुंबईतच करण्यात यावेत, असा सरकारनं पानसरे कुटुंबीयांसमोर प्रस्ताव ठेवला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी पानसरे कुटुंबीयांची भेट घेतली होती. डॉक्टरांनीही पानसरेंना मुंबईला हलवण्यासाठी होकार दिल्यानंतर पानसरेंना एअर अँम्ब्युलन्सनं मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.