यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात. 

Updated: Nov 13, 2015, 09:44 AM IST
यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग title=

यवतमाळ : फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात. 

या दोन्ही बसेस कच-याच्या ढिगा-यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे या कच-याच्या ढिगा-याला आग लागली त्यात परिवर्तन आणि सेमी लक्झरी बस जळून खाक झाल्या.

या घटनेवरुन आगारातील ढिसाळ कारभार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे आगारात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आगीच्या घटना घडू शकतात त्यामुळे हे ढिगारे लवकरात लवकर काढण्याची पूर्वसूचना आगार प्रमुखांना देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.