नागपुरात आग लागून ७ झोपड्या खाक

घराच्या वास्तूपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून ७ झोपड्या जळाल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या जयताळा परिसरातील अष्टविनायक नगरात ही आग लागली. 

Updated: Nov 16, 2016, 06:09 PM IST
नागपुरात आग लागून ७ झोपड्या खाक
संग्रहित छाया

नागपूर : घराच्या वास्तूपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून ७ झोपड्या जळाल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या जयताळा परिसरातील अष्टविनायक नगरात ही आग लागली. 

प्रशांत इरखेडे यांच्या घराच्या वास्तूपूजनाचा  कार्यक्रम होता. जेवण तयार करण्याचे काम शेजारी सुरु असताना अचानक गॅस स्टोव्हचा भडका उडून बाजूच्या झोपडीला आग लागली. 

पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केलं. यात तीन एलपीजी सिलिंडर्सचा स्फोट झाला त्यामुळे आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केले. या आगीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या ७ झोपड्या आणि सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.