सोलापूर: तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण.
विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
प्रणिती शिंदे यांचे पीए ओमकार ढेकळेंसह आणखी तीन जणांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी प्रणिती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
२०१३ मध्ये सचिन म्हस्के या तरुणानं प्रणिती शिंदे यांच्याविषयी छापून आलेली बातमी फेसबुकवर पोस्ट केली होती. एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये प्रणिती शिंदेंच्या कथित सहभागाची ही बातमी होती.
तरुणानं ही बातमी फेसबुकवर पोस्ट केल्यानं प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी सचिन म्हस्केला घरात जाऊन मारहाण केली होती. त्याप्रकरणी आज कोर्टानं प्रणिती शिंदे, त्यांचा पीए ओमकार ढेकळे आणि आणखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.