एसआरपीएफच्या सहा जवानांवर गुन्हे दाखल

एसआरपीएफच्या सहा जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परस्पर रजा राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2017, 07:51 AM IST

अमरावती : एसआरपीएफच्या सहा जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परस्पर रजा राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक ९, मध्ये कार्यरत असलेल्या 'डि' 'सी' कंपनीचे पोलीस जवान मागील काही महिन्यांपासून गडचिरोली येथे बंदोबस्ताला तैनात आहेत. 

यातील काही जवानांना परीक्षेसाठी सुटी दिल्यामुळे अमरावतीत असलेल्यांपैकी सहा जवानांना दहा ते बारा दिवसांसाठी परीक्षेसाठी गेलेल्या जवानांच्या जागी पर्यायी व्यवस्था म्हणून गडचिरोलीला जाण्याचे आदेश दिले.

मात्र हे सहा जवान गडचिरोलीला जाता परस्पर गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुद्धएसआरपीएफच्याच एका पोलीस निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.