जळगाव : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? यावर जरी जाहीरपणे खल सध्या होत नाहीय. पण, याच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचाही घोडा दौडत असल्याचं समोर आलंय.
महायुतीतील अनेक नेत्यांच्या मुख्यमंत्री होण्याची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही... कोणत्या ना कोणत्या मुहूर्तावर विविध मार्गांनी या इच्छा समोर आल्यात.
आता, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचीही मुख्यमंत्रीपदाची आशा सरळ सरळ व्यक्त झाली नसली तरी लपूनही राहिलेली नाही. खडसे यांनी थेट मागणी न करता आत्तापर्यंत या पदासाठी उत्तर महाराष्ट्र वंचित राहिल्याचं म्हटलंय.
खडसे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही ‘उत्तर महाराष्ट्राची’ खंत बोलून दाखवली. मग, खडसे यांच्या या खंत वजा मागणीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही समर्थन दिलं.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.