खान्देशातील अहिराणी भाषेत नाट्य संमेलनाची मागणी

खान्देश विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजन करण्यात आलेल्या ५ व्या मराठी साहित्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली.

Updated: Apr 10, 2016, 09:08 PM IST
खान्देशातील अहिराणी भाषेत नाट्य संमेलनाची मागणी  title=

धुळे : खान्देश विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजन करण्यात आलेल्या ५ व्या मराठी साहित्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली. ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अद्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यावेळी अहिराणी साहित्य समेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 

नाट्य परिषदेचे पुढचे संमलेन खान्देशातील जळगावात भरवावे अशी विनंती मोहन जोशी यांना करत राज्य सरकार त्यासाठी योग्य ती मदत करेन अशी ग्वाही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर ग्रामीण शाखेचं उद्घाटन महसूलमंत्री एकनाथ खडसे तसच नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत जळगावात पार पडलं. आतापर्यंत सगळ्या भाषांमध्ये संमलेन झालं त्याचप्रमाणे ते खान्देशातील अहिराणी या बोलीभाषेतही व्हावे यासाठी आपणही परिषदेच्या सदस्यांना विंनती करू असं मोहन जोशी यांनी यावेळी सांगितलं.