कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सनातन संस्थेवर अजूनदेखील बंदी का घातलेली नाही?, या बाबतचा खुलासा करावा, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.
दरम्यान, ३० डिसेंबरला राजाराम पुरी पोलिस ठाण्यामध्ये सनातन संस्थेने पाठवलेले पत्र हे धमकीचेच असून पोलिस या बाबत उदासीन का? तसेच इतक्या खुले पणाने पाठवलेल्या या पत्रामध्ये साक्षीदारांची काळजी घ्या, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. ही धमकीच असल्याचे मुक्ता दाभोलकरांनी म्हटले आहे.
समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरातून सनातन संस्थेवर बंदीची मागणी झाली होती.