जैतापूर : ‘शिवसेनेनं जैतापूर आंदोलनाचा वापर केवळ सत्तेसाठी करू नये...’ असं म्हणत जैतापूर प्रकल्पविरोधी नेत्यांनी सेनेला जोरदार खडे बोल सुनावलेत.
एन्रॉनमाणे केवळ सत्तेसाठी सेनेनं जैतापूर आंदोलनाचा वापर करू नये... केवळ दिखावा न करता पूर्ण ताकदिनिशी सेनेनं या आंदोलनात उतरावं... तरच या प्रकल्पाला हद्दपार करता येईल, असं जैतापूरविरोधी आंदोलनाचे नेते निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी म्हटलंय. यासाठी ते लवकरच उद्धव ठाकरेंची भेटही घेणार आहेत. दरम्यान, कोळसे पाटील यांनी केलेले आरोप शिवसेना आमदार राजन साळवी यांनी मात्र फेटाळून लावलेत.
शनिवारी, जैतापूर प्रकल्प परिसरात झालेल्या या आंदोलनात मच्छीमार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यातही महिलांची संख्या लक्षनिय होती. यावेळी जैतापूर प्रकल्पा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेकडो मच्छिमारांना अटक
जैतापुर प्रकल्प विरोधातील यापूर्वीच्या आंदोलनांचा अनुभव पाहता रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मोठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. मात्र, हे आंदोलन अहिंसक मार्गानं पद्धतीनं पार पडलं. शेकडो मच्छीमारांनी या आंदोलनात स्वत:ला अटक करवून घेतली.
शिवसेनेचे नेते हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कार्यकर्त्यांसह यात सहभागी झाल्यानं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.