नगरपालिका निवडणूक - अमळनेर शहर पेटलं

अमळनेर शहरात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत सर्वपक्षीय आघाडीचे नेते अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: Nov 27, 2016, 05:47 PM IST
नगरपालिका निवडणूक - अमळनेर शहर पेटलं title=

जळगाव : अमळनेर शहरात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत सर्वपक्षीय आघाडीचे नेते अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आलं आहे. 

अनिल भाईदास पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर शिरीष चौधरी यांनी जबर मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अनिल भाईदास पाटील यांना मारहाण केल्यानंतर अमळनेर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाची संतप्त जमावाने तोडफोड केली आहे. दरम्यान आमदार शिरीष चौधरी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे भाऊ रविंद्र चौधरी यांनी अमळनेर शहरात दहशत निर्माण केल्याचा आरोप सर्वपक्षीय आघाडीने म्हटलं आहे.