मुंबई : नावात काय आहे ? असं म्हटलं जातं.. पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणूकीत पराभूतही होऊ शकता. लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते. त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.
याही वेळी विधानसभा निवडणुकीत सारख्या नावांचे उमेदवार राज्यभरात रिंगणात आहेत. हा चकवा देणा-या नामसाधर्म्याचा फंडा कसा आहे, यावर एक नजर.
पाहा साम्य असलेले उमेदवार
- उरण मतदारसंघात चार महेंद्र घरत
महेंद्र शांताराम घरतही अपक्ष म्हणून रिंगणात
- अलिबाग मतदारसंघात दोन मधुकर ठाकूर
अपक्ष उमेदवार मधुकर ठाकुरही निवडणुकीच्या रिंगणात
- पनवेल मतदारसंघात दोन बाळाराम पाटील
शेकापच्या बाळाराम पाटलांपुढे डोकेदुखी
- पनवेल मतदारसंघात दोन प्रशांत ठाकूर
प्रशांतदादा भार्गव ठाकूरही अपक्ष म्हणून रिंगणात
- मुरबाड मतदारसंघात दोन गोटीराम पवार
गोटीराम गणू पवारही अपक्ष म्हणून रिंगणात
- बेलापूर मतदारसंघात दोन मंदा म्हात्रे
अपक्ष मंदाताई म्हात्रे निवडणूकीच्या रिंगणात
- चिंचवड मतदारसंघात तीन लक्ष्मण जगताप
भाजपच्या लक्ष्मण पांडुरंग जगतापांपुढे डोकेदुखी
- यवतमाळ मतदारसंघात दोन राहुल ठाकरे
राहुल अशोकराव ठाकरेही अपक्ष म्हणून रिंगणात
- नांदगाव मतदारसंघात दोन अनिल आहेर
अनिल म्हसू आहेरही अपक्ष म्हणून रिंगणात
- भोसरी मतदारसंघात दोन सुलभा उबाळे
- पुरंदर-हवेली मतदारसंघात दोन संजय जगताप
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.