शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार

केंद्रातील भाजप आणि शिवसेना युती संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा, नरेंद्र मोदी यांना सोपवणार आहेत.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Sep 29, 2014, 01:13 PM IST
शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडणार title=

मुंबई : केंद्रातील भाजप आणि शिवसेना युती संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा, नरेंद्र मोदी यांना सोपवणार आहेत.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर केंद्रातील युती बद्दल काय असं सर्वत्र विचारलं जात होतं, यानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर अनंत गिते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवणार असल्याचं म्हटलं आहे.

यावरून आणखी शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखी रूंदावणार आहे. कारण निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुरावा दूर होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र त्या शक्यतेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज ठाकरे यांनी काल कांदिवलीतील सभेत शिवसेना आणि भाजपवर टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे राहिले असते तर त्यांनी केंद्रातली युतीही नाकारली असती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीबद्दल काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.