VIDEO : श्रीराम लागूंचाही 'नटसम्राट' व्हायरल!

नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. पण, काही वर्षांपूर्वी रंगमंचावर दिसणारं श्रीराम लागू यांचं 'नटसम्राट' हे नाटक सध्या सोशल वेबसाईटच्या माध्यमातून सध्या व्हायरल होताना दिसतंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2016, 08:59 AM IST
VIDEO : श्रीराम लागूंचाही 'नटसम्राट' व्हायरल! title=

मुंबई : नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. पण, काही वर्षांपूर्वी रंगमंचावर दिसणारं श्रीराम लागू यांचं 'नटसम्राट' हे नाटक सध्या सोशल वेबसाईटच्या माध्यमातून सध्या व्हायरल होताना दिसतंय. 

 

नुकतीच, नाना पाटेकर आणि श्रीराम लागू यांची भेट रसिकश्रोत्यांसाठी आनंदाची बातमी ठरली होती. नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' आल्यानंतर या खऱ्याखुऱ्या 'नटसम्राटानं'ही आपल्याला नानांचा चित्रपट पाहायची इच्छा व्यक्त केली होती. खरंतर या दोघां नटांच्या अभिनयाची तुलना करणं म्हणजे करंटेपणाचं लक्षण ठरेल पण, नानांचा 'नटसम्राट' चर्चेत असताना श्रीराम लागूंचाही 'नटसम्राट' कुणी विसरू शकणार नाही, हे नक्की.

श्रीराम लागूंच्या 'नटसम्राट' नाटकाचा सध्या यूट्यूबवर व्हायरल हाच तो व्हिडिओ...