नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लिऑन आणि संस्कारी बाबू जी आलोकनाथ स्टाटर अॅड फिल्म रिलीज झाली असून ही शॉर्ट फिल्मकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक चांगली बनली आहे.
यात दाखविण्यात आले की स्मोकिंग तुमच्यासाठी किती घातक आहे. यात तनू वेड्स मनूतील हास्य कलाकार दीपक डोबरियाल आहे. दीपक यात मृत्यू शैय्येवर पडलेल्याची भूमिका निभावत आहे.
त्याला शेवटची इच्छा विचारण्यात येते तेव्हा तो सनी लिऑनशी लग्न करण्याचे सांगतो. यात संस्कारी बाबू आलोकनाथ यांनी दीपकच्या वडिलांची भूमिका केली आहे. ते मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सनी लिऑनला सून बनवून आणतात.
पण सनी लिऑन आल्यानंतर काय क्लायमॅक्स होतो. ते पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अॅन्टी स्मोकिंग मेसेज देण्यात आला आहे. ११ मिनिटांची ही शॉर्ट फिल्म विभु पुरी यांनी दिग्दर्शन केले आहे.