‘वर्षात एकच सिनेमा करून बाकीचा वेळ वाटाणे सोलू?’

परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पायावर पाय ठेवत आपणही आता वर्षांतून एकच सिनेमा करण्याचं ठरवलं असा निर्धार शाहरुखनं केल्याचं नुकतंच एका बातमीत म्हटलं गेलं होतं. 

Updated: Oct 4, 2014, 12:28 PM IST
‘वर्षात एकच सिनेमा करून बाकीचा वेळ वाटाणे सोलू?’ title=

मुंबई : परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पायावर पाय ठेवत आपणही आता वर्षांतून एकच सिनेमा करण्याचं ठरवलं असा निर्धार शाहरुखनं केल्याचं नुकतंच एका बातमीत म्हटलं गेलं होतं. 

पण, आपण कधीही वर्षांतून एकच सिनेमा करणार नाही... असं शाहरुख खाननं स्पष्टीकरण दिलंय. ‘अरे मित्रांनो माझं स्टेटमेन्ट एव्हढं सीरियसली घेत जाऊ नका... वर्षांतून एकच सिनेमा करणार असा माझा कोणताही पण नाही... मी असं यासाठी म्हटलं होतं की मला एका वेळेतच एक सिनेमा पूर्ण करायचाय...’ असं शाहरुख म्हणतोय. 

‘जर एखाद्या सिनेमाचं शूटींग ४० दिवसांत पूर्ण झालं तर बाकीचा वेळ मी काय घरी बसून वाटाणे सोलू का?’ असं गंमतीत म्हणत शाहरुखनं आपण आपल्याच नियमांवर पुढेही चालणार असल्याचं म्हटलंय. 

यावेळी, त्याला ८ पॅक अॅब्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं ‘हॅपी न्यू इअर’ सिनेमाची दिग्दर्शिका फराह खान हिलाही चिमटा काढला. ‘तुमने मेरा अॅब देखा... हुनर नही’ असं मी नेहमीच फराहला म्हणतो, असं हसत हसत शाहरुखनं म्हटलंय. 

शाहरुखचा आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, शाहरुख खान आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.