सेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ!

सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.

Updated: May 28, 2015, 10:20 PM IST
सेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ! title=

मुंबई : सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.

येत्या दोन आठवड्यात हिंदी, मराठी, भोजपुरी असे तब्बल 50 सिनेमे प्रदर्शित होणार आहे. 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन'नं याबाबतचा खुलासा केलाय. 

उन्हाळ्याच्या सुट्यांमूळे निर्मात्यांकडून चित्रपटांची संख्या अचानक वाढल्यानं सेंन्सर बोर्डावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ओव्हरटाइम काम करावा लागतोय. एव्हढंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्यात. 

उद्या म्हणजेच शुक्रवारी केवळ बॉलिवूडचे पाच सिनेमे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. वेलकम टू कराची, इश्केदारियां, लतीफ, पी से पीएम तक आणि आई लव देसी या पाच सिनेमांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सिनेमा कोणता हे लवकरच समजेल.  

तसंच मराठीत सिद्धांत, पेईंग घोस्ट, धुरंधर भाटवडेकर, प्राईमटाईम हे सिनेमे शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

दरम्यान हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी असे तब्बल 50 हून अधिक सिनेमे पुढच्या दोन आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.