नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांपासून दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमाविषयी किंवा नात्याविषयी चर्चां चघळल्या जात आहेत. पण, या दोघांनी मात्र अजूनही आपल्या नात्याविषयी मौनचं बाळगणं पसंत केलंय. पण, नेहमीप्रमाणेच यावेळीही रणवीरनं काहीही न बोलता आपलं दीपिकाविषयी वाटणारं प्रेम व्यक्त केलंय.
नुकताच, रणवीर एअरपोर्टवर जवळपास तीन तास ताटकळत दीपिकाची वाट पाहत होता... त्याला दीपिकाला सरप्राईज द्यायचं होतं...
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, दीपिकाला एअरपोर्टवर सरप्राईज देण्याअगोदर रात्री उशीरा रणवीर सिंहला एका कार्यक्रमात पाहिलं गेलं होतं. यानंतर एक फुलांचा गुच्छ घेऊन रणवीर रणवीर एअरपोर्टवर हजर झाला... आपल्या गाडीतच बसून तो तब्बल तीन तास दीपिकाची वाट पाहत होता.
दीपिका जेव्हा एअरपोर्टवर दाखल झाली तेव्हा समोर रणवीरला पाहून तिचाही चेहरा आनंदानं उजळला. आता याला तुम्ही प्रेम नाही तर मग काय म्हणाल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.