बाजीरावनंतर आता रणवीर बनणार 'अलाउद्दीन'

'बाजीरावा'च्या भूमिकेत रणवीर सिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली... आता हाच बाजीराव लवकरच 'अलाउद्दीन खिलजी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: May 21, 2016, 02:16 PM IST
बाजीरावनंतर आता रणवीर बनणार 'अलाउद्दीन'

मुंबई : 'बाजीरावा'च्या भूमिकेत रणवीर सिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली... आता हाच बाजीराव लवकरच 'अलाउद्दीन खिलजी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच निर्माता - दिग्दर्शक संजय लीला भन्साळीनं खिलजी वंशाचा शासक अलाउद्दीन खिलजीची राणी पद्मावतीबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं... याच विषयावर आपल्याला सिनेमा बनवायची इच्छा असल्याचंही त्यानं बोलून दाखवलं...

दीपिका दिसणार 'पद्मावती'च्या भूमिकेत... 

त्यानंतर सुरु झाला पद्मावती आणि अलाउद्दीनचा शोध... आणि आता हा शोध येऊन संपतोय तो दोन नावांवर... रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण... 

नकारात्मक भूमिकेत रणवीर

हा सिनेमा २०१७ साली प्रदर्शित होणार आहे. यासाठी दीपिकानं अजून तिचा होकार कळवला नसला तरी रणवीरनं मात्र ही भूमिका स्वीकारलीय. ही नकारात्मक भूमिका आहे.