'लापतागंज'च्या अभिनेत्याची आत्महत्या

छोट्या पडद्यावर एका लोकप्रिय कॉमेडी धारावाहिकमध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका निभावणाऱ्या एका अभिनेत्यानं आत्महत्या केलीय. रामजी शांडिल्य असं या अभिनेत्याचं नाव आहे.

Updated: Feb 12, 2015, 02:18 PM IST
'लापतागंज'च्या अभिनेत्याची आत्महत्या title=

नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर एका लोकप्रिय कॉमेडी धारावाहिकमध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका निभावणाऱ्या एका अभिनेत्यानं आत्महत्या केलीय. रामजी शांडिल्य असं या अभिनेत्याचं नाव आहे.

'सब टीव्ही' या चॅनेलवरची लोकप्रिय मालिका 'लापतागंज'मध्ये रामजीनं पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळापर्यंत मानसिक तणावाखाली असलेल्या रामजीनं फाशी लावून आत्महत्या केलीय.


रामजी शांडिल्य

२८ वर्षीय रामजी यानं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. मंगळवारी रात्री रामजी घरी परतला तेव्हा तो खूपच तणावाखाली होती. त्यानंतर, रात्री त्यानं मफलरच्या साहाय्यानं पंख्याला लटकून गळफास लावून आत्महत्या केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.