फिल्म रिव्ह्यू: 'कट्टी-बट्टी' एका विनोदी लव्हस्टोरीचा वादळी शेवट!

नॅशनल अॅवॉर्ड विनर कंगना राणावतचा 'कट्टी-बट्टी' आज रिलीज झालाय. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या कट्टी-बट्टीमध्ये कंगना-इमरानचा एक डायलॉग आहे. ज्यानुसार "'प्रेमा'पेक्षा 'प्रेमातील वेदना' अधिक विकल्या जाते. म्हणूनच DDLJ फक्त एकदा बनला आणि देवदास अनेक वेळा. मुकेशचे पण दर्द भरे गाणे विकले जातात", असं कंगना चित्रपटात म्हणते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 18, 2015, 03:22 PM IST
फिल्म रिव्ह्यू: 'कट्टी-बट्टी' एका विनोदी लव्हस्टोरीचा वादळी शेवट! title=

मुंबई: नॅशनल अॅवॉर्ड विनर कंगना राणावतचा 'कट्टी-बट्टी' आज रिलीज झालाय. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या कट्टी-बट्टीमध्ये कंगना-इमरानचा एक डायलॉग आहे. ज्यानुसार "'प्रेमा'पेक्षा 'प्रेमातील वेदना' अधिक विकल्या जाते. म्हणूनच DDLJ फक्त एकदा बनला आणि देवदास अनेक वेळा. मुकेशचे पण दर्द भरे गाणे विकले जातात", असं कंगना चित्रपटात म्हणते.

'कट्टी-बट्टी' म्हणायला तर माधव आणि पायल (इमरान-कंगना)च्या प्रेमामधील दर्दची कथा आहे. मात्र निखिल अडवाणी कदाचित प्रेमातील वेदना आणि डोकेदुखी यात कन्फ्यूज झाले असं वाटतं. कट्टी-बट्टी प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'हिरो'नंतर दिग्दर्शक निखिल अडवाणींचा हा दुसरा खराब चित्रपट.

आणखी वाचा - 'कट्टी-बट्टी'च्या गाण्यात इमरान, कंगणाने २४ तास केलं किस

कथानक

माधव काबरा उर्फ मॅडी (इमरान खान) अहमदाबादमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेतोय. तिथं त्याची भेट पायल (कंगना) सोबत होते, दोघांमध्ये प्रेम होतं. कॉलेजनंतर दोघं सोबत राहायला लागतात. मात्र काही तरी कारणानं पायल मॅडीला सोडून जाते. चित्रपटाची सुरूवात इथूनच होते, जेव्हा मॅडी पायलला विसरू शकत नाही. त्याला कळतंच नाही की, पायल त्याला सोडून का गेली. देवदाससारखा संपूर्ण चित्रपटात तो पायलचा शोध घेत असतो आणि शेवटी एक वेगळीच कथा समोर येते. 

 

अभिनय

चित्रपटात कोणतंही कॅरेक्टर नॉर्मल दिसत नाही. मॅडी बिअर समजून फिनाईल पितो, का तर दोन्ही बॉटल्स सारख्या दिसतात. माधवचा बॉस दक्षिण भारतीय व्यक्ती जो 1980च्या दशकातील घिसपिटं कॅरेक्टर दर्शवतो. चित्रपटात एक FOSLA (Frustrated One Sided Lovers Association)बँड आहे. ज्यातील सगळे सदस्य प्रेमात फसवणूक झालेले आहेत. त्यांनी तयार केलेलं गाणं ‘प्यार करने वालों की जला दे लुंगी. प्यार की पुंगी, प्यार की पुंगी’असं आहे. कट्टी-बट्टी एक रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे ज्यात रोमांस आणि कॉमेडी क्वचितच पाहायला मिळते.

कंगनाची कमकुवत भूमिका

चित्रपटात सर्वात कमकुवत भूमिका आहे ती क्वीन कंगना राणावतची... चित्रपटातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे या दमदार अभिनेत्रीला पुरेसा वेळ आणि भूमिकाच मिळाली नाही. चित्रपटात तिनं काही चांगले सीन दिले आहेत आणि हे सीन पण तेव्हा येतात जेव्हा आपण चित्रपटाकडून अपेक्षा सोडलेली असते.

संपूर्ण जबाबदारी इमरान खानवर

चित्रपटात संपूर्ण जबाबदारी इमरान खानच्या खांद्यावर आहे. स्क्रीनवर सर्वाधिक वेळ त्याला मिळालाय आणि त्यानं आपल्यापरीनं खूप चांगला अभिनयही केलाय. पण त्याच्या अभिनयाला काही मर्यादा आहेत आणि दिग्दर्शकाने त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवलेल्या दिसतात. कंगनाच्या टॅलेंटचा वापर नाहीच्या बरोबर झाला. 

आणखी वाचा - सलमान खानने 'कट्टी बट्टी' साठी कंगनाला कसे केले राजी पाहा

चित्रपटाची सपोर्टिंग कास्ट वाईट नाहीय. मात्र त्यांचे रोल खूप वाईट लिहिले गेले आहेत. हसवण्यासाठी चित्रपटात जबरदस्तीनं खराब विनोद टाकण्यात आले आहेत. चित्रपटात माधव आणि पायल एका कासवाला पाळतात. कासवाचं नाव मिल्खा ठेवतात, हा चित्रपटातील सर्वात चांगला विनोद आहे. सोबतच प्रेक्षकांनाही एक संदेश देतो, जर 'कट्टी-बट्टी' बोर होत असेल तर थिएटरमधून 'भाग मिल्खा भाग'... म्हणून आम्ही चित्रपटाला देतोय 2 स्टार्स... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.