जाणून घ्या, ऊर्मिलाचा पती मोहसिनबद्दल...

ब्रेकअपचा सीझन काही वेळ सुरू राहिल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझनच सुरू झालाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या विवाहाच्या बातमीनंतर थोड्याच वेळात मराठमोळी बॉलिवूडची 'छम्मा... छम्मा' गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिच्या विवाहाची बातमी आली... आणि तिच्या अनेक चाहत्यांना अक्षरश: धक्का बसला. 

Updated: Mar 4, 2016, 04:21 PM IST
जाणून घ्या, ऊर्मिलाचा पती मोहसिनबद्दल...  title=

मुंबई : ब्रेकअपचा सीझन काही वेळ सुरू राहिल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझनच सुरू झालाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या विवाहाच्या बातमीनंतर थोड्याच वेळात मराठमोळी बॉलिवूडची 'छम्मा... छम्मा' गर्ल उर्मिला मातोंडकर हिच्या विवाहाची बातमी आली... आणि तिच्या अनेक चाहत्यांना अक्षरश: धक्का बसला. 

९० च्या दशक गाजवणाऱ्या ऊर्मिलानं वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसीन अख्तर मीर याच्याशी कुणालाही फारशी भनक लागू न देता विवाह केला. गुरुवारी हा विवाहसोहळा पार पडला. 

यानंतर दिलेल्या एका स्टेटमेन्टमध्ये उर्मिलानं, काही मोजक्याच कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडल्याचं जाहीर केलं. 

कशी झाली उर्मिला - मोहसिनची भेट... 

  • उर्मिलाचा पती हा काश्मीरमधला बिझनेसमन आहे. 

  • ३२ वर्षीय मोहसिन हा ऊर्मिलाहून जवळपास दहा वर्षांनी लहान आहे. 

  • उर्मिला आणि मोहसिनची भेट झाली ती फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे... मनिष उर्मिला आणि मोहसिन दोघांचाही कॉमन फ्रेंड आहे. त्यामुळेच मनिष उर्मिलाच्या लग्नसोहळ्यातही दिसला. 

  • मोहसिननं आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा पूर्ण करत असतानाच मोहसिन मॉडेलिंगमध्येही दिसला.

  • मोहसिननंही काही सिनेमांमध्येही काम केलंय. 'मुंबई मस्त कलंदर' तसंच 'इटस अ मॅन्स वर्ल्ड' या सिनेमांत त्यानं भूमिका केल्या.