मुंबई: बॉलिवूडची बहुचर्चित आणि चांगलं यश मिळवणारी अभिनेत्री परिणिती चोपडाचं अभिनय क्षेत्रात येण्याचं कधीच मन नव्हतं. लंडनमध्ये एका कंपनीत काम करत असताना तिथंच स्थायिक होण्याची तिची इच्छा होती. पण तिला परत यावं लागलं.
परिणिति म्हणते की, "जर मंदीमुळं माझी नोकरी नसती गेली तर मी भारतात परत आलीच नसती. मी व्यवसायानं बॅंकर आहे. इनव्हेस्टमेंट बॅकिंगमध्येच मला करिअर करायचं होतं. अभिनयाची तर गोष्ट सोडा मी परत आलीच नसती."
काही दिवसांपूर्वीच परिणिति 'कोन बनेगा करोडपती'च्या सातव्या हंगामात आली होती आणि जेव्हा अमिताभ बच्चन यांनी तिची प्रशंसा केली तेव्हा ती भावूक झाली.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री परिणिति म्हणते की, "जेव्हा एखादा दिग्दर्शक माझ्याकडे एखादा रोल घेऊन येतो आणि म्हणतो की आमच्याकडे खूपच मजबूत कॅरेक्टर आहे जे फक्त तूच करू शकते तर ही गोष्ट खूपच आनंददायी वाटते."
परिणितिनं आतापर्यंत फक्त तीन चित्रपट केले आहेत आणि तिचा चौथा चित्रपट 'दावत-ए-इश्क़' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.