‘पोलीस ‘महिला’ होती म्हणून एव्हढा गहजब?’

एका कार्यक्रमा दरम्यान खाक्या ड्रेसमध्ये असलेल्या महिला पोलिसाला उचलून घेतल्यानंतर अभिनेता शाहरुख खानवर बरीच टीका झाली. यानंतर, शाहरुखनं आपलं म्हणणं मांडलंय. 

Updated: Aug 14, 2014, 10:24 AM IST
‘पोलीस ‘महिला’ होती म्हणून एव्हढा गहजब?’ title=

मुंबई : एका कार्यक्रमा दरम्यान खाक्या ड्रेसमध्ये असलेल्या महिला पोलिसाला उचलून घेतल्यानंतर अभिनेता शाहरुख खानवर बरीच टीका झाली. यानंतर, शाहरुखनं आपलं म्हणणं मांडलंय. 

कोलकत्यात 9 ऑगस्ट रोजी पोलिसांसाठी आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमात शाहरुखनं ऑन ड्युटी असलेल्या एका महिला पोलिसाला आपल्या हातांत उचलून घेतलं होतं... आणि डान्सही केला होता. यावर, शाहरुख म्हणतोय की ‘हा वाद केवळ यामुळे निर्माण झालाय कारण पोलीस एक महिला होती’...

‘काही जण यावर वाद करतायत की एका खाक्या ड्रेसमध्ये एका पोलिसानं डान्स केला... पण, ते असं करतायत कारण हे एका महिला पोलिसानं केलंय… हे खूप आश्चर्यकारक आहे...’ असं म्हणत शाहरुखनं आश्चर्य व्यक्त केलंय. 

जवानांचं किंवा पोलिसांचं मनोरंजन करताना असं काही आपण काही पहिल्यांदाच केलं नाही हे सांगताना शाहरुख म्हणतो, ‘काही वर्षांपूर्वी ‘वीर जारा’चं शूटिंग करताना मी काही यूनिफॉर्म परिधान केलेल्या काही जवानांसोबत डान्स केला होता... त्यांचं मनोरंजन केलं होतं... 60 आणि 70 च्या दशकांत तर अभिनेते-अभिनेत्री सीमेवर जाऊन जवानांचं मनोरंजन करून त्यांना प्रोत्साहन देत असतं... मी मुंबईत जे केलं ते याहून काही वेगळं नव्हतं... पण, कोलकात्यात जे झालं ते मला समजण्यापलीकडे आहे...’

 मला असं अजिबात वाटत नाही की हा सगळा वाद ‘यूनिफॉर्म’वर होता... हा वाद झाला कारण या ‘यूनिफॉर्म’मध्ये एक महिला पोलीस होती... मला असं वाटतं, की असा वाद घालून केवळ स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातोय... आणि हे सगळं मूर्खपणाचं आहे...’ असं स्पष्टीकरण शाहरुखनं दिलंय. 

कोलकातामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. यावेळी, शाहरुखनं डान्स ग्रुपसोबत डान्स करताना एका महिला पोलीसाला आपल्या हातांत उचलून घेतलं होतं... यावर, अनेकांनी टीका केली होती. महिला पोलिसाला शाहरुखसोबत नाचण्याची परवानगी देऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संविधानाचा अपमान केला, अशी टीका राज्य काँग्रेस प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.