शाहरुखचा रेकॉर्ड तोडण्यात आमिरचा 'पीके' पडला मागे!

बॉलूवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या 'पीके' या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २६.६३ करोड रुपयांची कमाई केलीय. पण, आमिरच्या या सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई ही शाहरुखच्या 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी अपयशी ठरलीय. 

Updated: Dec 21, 2014, 08:16 AM IST
शाहरुखचा रेकॉर्ड तोडण्यात आमिरचा 'पीके' पडला मागे! title=

मुंबई : बॉलूवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या 'पीके' या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २६.६३ करोड रुपयांची कमाई केलीय. पण, आमिरच्या या सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई ही शाहरुखच्या 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी अपयशी ठरलीय. 

'पीके' हा सिनेमा सध्या देशभरातील ५,२०० स्क्रिन्ससहीत जगभरातील जवळपास ६००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलीय.

धम्माल कथा आणि कलाकारांचा धम्माल परफॉर्मन्समुळे या सिनेमावर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात. ओपनिंग कलेक्शन ध्यानात घेता 'पीके' या वर्षी चौथ्या नंबरवर आहे. 'पीके'हून अधिक चांगलं ओपनिग बँग बँग, सिंघम रिटर्न्स आणि हॅपी न्यू इअर या सिनेमांना मिळालेलं पाहिला मिळालंय. 

उल्लेखनीय म्हणजे सर्वात अधिक ओपनिंग कलेक्शनचा रेकॉर्ड शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इअर' या सिनेमाच्या नावावर आहे. या सिनेमानं पहिल्याच दिवशी ४४.९७ करोड रुपये कमाई केली होती. दुसऱ्या नंबरवर असलेल्या आमिर खानच्या 'धूम-३' या सिनेमानं ३६.२२ करोड रुपये कमावलेत.

'पीके' या सिनेमाचा निर्माता आहे विधु विनोद चोपडा तर या सिनेमात आमिरसह अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंह राजूपत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जरी या सिनेमाची ओपनिंग रेकॉर्डतोड झालेली नसली तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दिर्घकाळापर्यंत राहील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.