लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊच्या मडियांव पोलिस स्टेशनमध्ये एका वकिलाने रणबीर कपूर आणि फरहान अख्तर यांच्यासह सात जणांविरोधात ऑनलाइन शॉपिंगमध्ये गंडविल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. वकिलाने दोन अशिलांना गंडविल्याचा आरोप लावला आहे.
मडियांव पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर संतोष कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार केशवनगरमध्ये राहणाऱे रजत बन्सल हे हायकोर्टाचे वकील आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २३ ऑगस्ट रोजी त्यांनी एका नामांकीत कंपनीचा एलईडी टीव्ही २९,९९९ रुपयांना आस्कमी बाजार नावाच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी केला. त्याचे पैसे डेबिट कार्डाने दिले.
रजतला १० दिवसात टीव्ही पाठविण्याचे कंपनीने सांगितले. पण १० दिवसात टीव्ही आला नाही. त्यानंतर कस्टमर केअरला कॉल करण्यात आला. पण तेथून रिपॉन्स आला नाही. त्यानंतर त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बातचित केली. पण काही कारवाई झाली नाही. रजत टीव्हीची वाटत पाहत होता. त्यानंतर वाट पाहण्याची हद्द संपली आणि त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
एएनआयने दिलेल्या बातमीनुसार कंपनीचे निदेशक संजीव गुप्ता, आनंद सोनभद, पीयूष पंकज, किरन कुमार श्रीवास्तव मूर्ती, कंपनी अधिकारी पूजा गोयल तसेच बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि फरहान अख्तर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली.
फरहान अख्तर आणि रणबीर हे दोन्ही या वेबसाईटची जाहिरात करतात. त्यामुळे दोघांचे नाव सामील करण्यात आले.
FIR filed against actors Ranbir Kapoor and Farhan Akhtar after complain by a Lucknow lawyer over an online shopping website advertisement
— ANI (@ANI_news) September 21, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.