3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी तुम्ही तयार आहात का?

३ इडियट्स हा असा चित्रपट आहे त्याच्याबद्दल विचार केला तर चांगले उद्गार आपोआप तोडून निघतील. या चित्रपटाचे चांगले रिव्ह्यू आले नाही तर हा पहिला भारतीय चित्रपट आहे की त्याने २०० कोटींचा पल्ला गाठला होता.

Updated: Jan 18, 2016, 10:06 PM IST
 3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी तुम्ही तयार आहात का?  title=

मुंबई : ३ इडियट्स हा असा चित्रपट आहे त्याच्याबद्दल विचार केला तर चांगले उद्गार आपोआप तोडून निघतील. या चित्रपटाचे चांगले रिव्ह्यू आले नाही तर हा पहिला भारतीय चित्रपट आहे की त्याने २०० कोटींचा पल्ला गाठला होता.

 

या चित्रपटाला पुन्हा पुन्हा पाहणाऱ्याची संख्या अधिक आहे. टीव्हीवर जितक्यावेळेस लागतो तिच्यावेळेस पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 'साला खडूस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या राजकुमार हिरानी यांना ३ इडियट्स आणि पीकेच्या सिक्वेल विचारले असता, म्हणाले. 
पीके संदर्भात माझ्याकडे कोणतीही कथा नाही. पण ३ इडियट्सच्या बाबतीत आयडीया आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही लवकरच या संदर्भात काही तरी करू असे त्यांनी म्हटले आहे. 

त्यामुळे आता तुम्हांला येत्या काही दिवसात ३ इडियट्सचा सिक्वेल पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पुन्हा आमीर खान, आर. माधवन आणि शरमन जोशी यांचे त्रिकूट धमाल करताना दिसणार आहे.