अबब! फोक्स वॅगन कंपनीत १ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा

जर्मनीतील सुप्रसिद्ध कार कंपनी फोक्स वॅगननं जगभरातील १ कोटींहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदूषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे. मात्र याचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसला असून या नवीन खुलाश्यानंतर कंपनीच्या शेअर दरात तब्बल २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

Updated: Sep 22, 2015, 10:26 PM IST
अबब! फोक्स वॅगन कंपनीत १ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा title=

फ्रँकफर्ट: जर्मनीतील सुप्रसिद्ध कार कंपनी फोक्स वॅगननं जगभरातील १ कोटींहून अधिक डिझेल गाड्यांमध्ये प्रदूषण चाचण्यांमध्ये फेरफार करु शकतील अशी उपकरणं लावल्याची कबुली दिली आहे. मात्र याचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसला असून या नवीन खुलाश्यानंतर कंपनीच्या शेअर दरात तब्बल २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून फोक्स वॅगनवर प्रदूषण चाचण्यांमध्ये फेरफार करणारे 'पोल्यूशन चिटींग डिव्हाईस' लावल्याचा आरोप होत आहे. आता कंपनीनंच याची कबुली दिल्यानंतर जगभरात फॉक्स वॅगनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अमेरिकापासून ते फ्रान्स, दक्षिण कोरियापर्यंत अशा अनेक देशांनी फोक्स वेगनविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यातील चौकशी दरम्यान येणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी कंपनीनं ६.५ अब्ज युरोजची तरतूद केली आहे. 

फोक्स वेगननं एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं डिजेल गा़ड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाची खोटी आकडेवारी समोर केली होती. तपासणी दरम्यान गाडीतून होणाऱ्या उत्सर्जनाचा आकडा कमी दाखवला आणि यामुळं गाडीतून अत्यल्प प्रदूषण होत असल्याचं दिसलं. मात्र प्रत्यक्षात गाडी जेव्हा रस्त्यावर धावायची त्यावेळी गाडीतून नियमापेक्षा ४० पट अधिक नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन होत होतं. 

फोक्स वॅगनमधील या घोटाळ्याचा कंपनीला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हं आहेत. सोमवारी फ्रँकफर्ट शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सचे दर १७ टक्क्यांनी घसरले होते. तर मंगळवारी शेअर्सचे दर थेट २३ टक्क्यांनी घसरले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.