www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाचा परिणाम आज एका टीव्हीवर `लाईव्ह` पाहायला मिळाला. रशियाच्या युक्रेनच्या क्रिमियामध्ये सैन्य घुसवण्याच्या निर्णयाचा निषेध करत एका `अॅन्कर`नं टीव्हीवरचं आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला.
`लिझ व्हॉल` असं या पत्रकार - अॅन्करचं नाव आहे. रशियाच्या `रशिया टुडे (आरटी)` या चॅनलवर बातम्या सादर करताना तिनं आपली भूमिका स्पष्ट करत व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करत सरळ सरळ टीव्हीवरच आपला राजीनामा देऊन टाकला.
`वैयक्तिकरित्या, रशियन सरकारच्या अनुदानानं चालणाऱ्या आणि पुतीन यांच्या कारवायांवर चीडीचूप राहण्याची भूमिका घेणाऱ्या नेटवर्कचा मी एक भाग बनू इच्छित नाही. मला मी एक अमेरिकन आहे, याचा अभिमान आहे आणि केवळ सत्य घटना प्रसारित करण्यावर माझा विश्वास आहे... आणि त्याचमुळे या बातमीपत्रानंतर मी राजीनामा देत आहे` असं जड अंत:करणानं म्हणत व्हॉल हिनं बातमीपत्र संपवलं.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.