अरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी

युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे. 

Updated: Oct 22, 2015, 10:58 PM IST
अरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी
प्रातिनिधिक फोटो

लंडन: युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे. 

युरोपमधील डेलीमेल या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार मार्टिन सिंग हे ब्रिस्टल इथल्या आरएसी नामक कॉल सेंटरमध्ये कामाला होते. काही दिवसांपूर्वीच मार्टिन यांची पत्नी रुबी यांनाही त्याच कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली होती. चार मुलं झाल्यावर रुबी पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्यानं सिंग कुटुंबीय आनंदात होतं. 

आणखी वाचा - शिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो

पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी सिंग यांनी ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केलं. मात्र हा किस सिंग यांना भलताच महागात पडला आहे. सिंग यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं असून किस केल्यामुळं कंपनीनं कामावरुन काढल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. मी याची माहिती माझ्या सहकाऱ्यांना दिली असता त्यांनादेखील धक्का बसला असं सिंग यांनी म्हटलं आहे. कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून कंपनीच्या वरिष्ठांकडून माझा छळ होत होता असा गंभीर आरोपही सिंग यांनी केला. आता माझी पत्नी रुबी कामावर जात असली तरी या घटनेमुळं ती निराश झाल्याचं सिंग यांनी सांगितलं. 

दरम्यान, आरएसी कंपनीतील अधिकाऱ्यांनी सिंग यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मार्टिन सिंग हे दोन महिन्यापूर्वीच एका एजन्सी मार्फत आमच्या कंपनीत लागले होते. कामाच्या वेळेत स्वतःचा मोबाईल वापरणं, ऑनलाइन व्हिडिओ बघणं, ड्रेसकोडचं उल्लंघन करणं या कारणांवरुन त्यांना कामावरुन काढल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 

आणखी वाचा - थरारक व्हिडिओ : विमानाच्या छतावर बाईक चालवताना कधी पाहिलीत का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.