www.24taas.com, झी मीडिया,टोकियो
वित्तीय संकटामुळे जिथे इतर देशांना आर्थिक फटका बसला तिथे जपानी बँका मात्र होणाऱ्या नुकसानीपासून वाचल्यात आणि या गोष्टीचे सारे श्रेय इंग्रजी भाषेला जाते, असे जपानचे अर्थमंत्री तारो असो यांनी म्हटलयं.
२००८ मध्ये हे वित्तीय संकट आलं होते. आमच्या बँकेतील वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे आम्हाला आर्थिक संकटाचा फटका बसला नाही. असे विधान ‘तारो असो’ यांनी केलय. इंग्रजी येत नसल्यामुळे आमच्या बँक अधिकाऱ्यांना बँकसंदर्भातली काही आर्थिक उत्पादने समजू शकली नाही आणि ती खरेदी करण्याचा धोका त्यांनी उचलला नाही. त्याउलट, उरलेल्या बँकांनी अशी उत्पादने विकत घेतल्यामुळे त्या आर्थिक संकटात फसल्या गेल्या.
असो यांनी टोकियोमधील एका सेमिनारमध्ये असं म्हटलयं की, अनेक लोकांनी विचार न करता आणि कर्ज मिळतात म्हणून ही उत्पादने विकत घेतली. जपानी बँका यांसारख्या उत्पादनांना बळी पडल्या नाहीत. यावेळी एका अमेरिकी बँकने असं म्हटल होतं, की जपानी बँका मजबूत आहेत. परंतु खरं कारण आहे ते म्हणजे जपानी बँक अधिकाऱ्यांना इंग्रजी भाषा येत नाही. त्यामुळे त्यांनी ही उत्पादने विकत घेतली नाहीत.
असो यांचे हे विधान आधीच्या विधानासारखे त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवू शकते. त्यांनी जानेवारीत एक विधान केलं होत ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध यांनी लवकर मरण आलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर होणारा सरकारचा खर्च कमी होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.