जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.

Updated: Nov 17, 2015, 01:35 PM IST
जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन  title=

मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.

आणखी वाचा - इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

रशियन इंटेलिजन्स डेटाबद्दल बोलतांना अंताल्या इथं पुतीन यांनी हे वक्तव्य केलं. पॅरिस हल्ल्यानंतर तुर्कीतही हल्ला झाला... त्यानंतर तुर्कीत सुरू असलेल्या जी२० समिटची सुरक्षा वाढविण्यात आली. पॅरिस हल्ल्यात तब्बल १२९ जणांचा मृत्यू झाला आणि असंख्य जखमी झाले.

आणखी वाचा - बेल्जियमचा अब्दुल हामिद पॅरीस बॉम्बस्फोटाचा मूख्य सूत्रधार

पुतीन पुढे म्हणाले, तेलाची बेकायदेशीर विक्री त्यामुळं इस्लामिक देशांच्या महसुलात प्रचंड वाढ झालीय. आकाशातून एअरक्राफ्टनं घेतलेल्या फोटोंवरून किती बेकायदेशीर पणे ही तेल विक्री होते, हे स्पष्ट होत असल्याचंही पुतीन म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.