लग्नाला नकार दिला म्हणून १५० महिलांचा शिरच्छेद, गर्भवतींचाही समावेश

दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या क्रूरतेच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच एखाद्या संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकेल अशी घटना घडल्याचं आता समोर येतंय. समाचार एजन्सीच्या माहितीनुसार, इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी लग्नाला नकार दिल्यानं १५० हून अधिक महिलांचा क्रूर शिरच्छेद केलाय. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक स्त्रिया गर्भवती होत्या.

Updated: Dec 18, 2014, 10:51 AM IST
लग्नाला नकार दिला म्हणून १५० महिलांचा शिरच्छेद, गर्भवतींचाही समावेश title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या क्रूरतेच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच एखाद्या संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकेल अशी घटना घडल्याचं आता समोर येतंय. समाचार एजन्सीच्या माहितीनुसार, इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी लग्नाला नकार दिल्यानं १५० हून अधिक महिलांचा क्रूर शिरच्छेद केलाय. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक स्त्रिया गर्भवती होत्या.

‘इस्लामिक स्टेट’नं इराकच्या पश्चिम राज्य अल अनबारच्या फालुजामध्ये जवळपास १५० महिलांची केवळ यासाठी क्रूर हत्या केलीय कारण या महिलांनी दशतवाद्यांशी लग्न करण्यास ठाम नकार दिला होता.  

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महिलांना एका रांगेत उभं करून एक-एक करून त्यांची हत्या करण्यात आली. या नरसंहाराच्या बातम्यांना इराकच्या समाचार एजन्सीजनी पृष्टी दिलीय. तसंच तुर्की मानवाधिकार मंत्रालयानंही या घटनेला दुजोरा दिलाय. 

तुर्की मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी महिलांच्या हत्येनंतर त्यांना सामूहिकरित्या जमिनीखाली दफन केलं.  

या घटनेपूर्वी याच दहशतवादी संघटनेनं स्थानिक रहिवाशांतील ५० लोकांना अतिशय क्रूररित्या ठार केलं होतं. यामध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.