सॅन फ्रेंसिस्को : फेसबूकने युजर्ससाठी एक नवीन अॅप बनवला आहे. 'चाटबोट्स' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपद्वारे फेसबूक वापरणारे इ-कॉमर्स किंवा इतर कंपन्यांना सहज जोडले जातील असा विश्वास फेसबूकनं व्यक्त केला आहे.
कोणाला होणार फायदा ?
या अॅपचा सर्वाधिक फायदा ऑनलाईन खरेदी, विक्री करणाऱ्यांना होणार आहे. जर तुम्ही टाइप केल की मला राहण्यासाठी एका खोलीची आवश्याकता आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला हॉटेल कुठे आहे, त्याची किंमत काय आहे, अशी सर्व माहिती एका मेसेजद्वारे उत्तरात येईल.
अॅप तयार करण्याचा उद्देश
ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी फेसबूकनं हे अॅप तयार केलं आहे. फेसबूकनं हे अॅप ई कॉमर्स साईट आणि सीएनएन चॅनलच्या मदतीनं तयार केलं आहे.
तक्रारीसाठी कस्टमर केअरची गरज नाही
या अॅपद्वारे जर काही ग्राहकांना तक्रार करायची असेल तर कसस्टमर केअर ला फोन करायची गरज भासणार नाही, तर ते सहज आपली तक्रार कंपनीला करू शकतात.