काठमांडू : भारतात ५०० आणि १००० नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर त्याचा थेट परिणाम नेपाळमधील कॅसिनोवरही झाला. नेपाळच्या कॅसिनोमध्ये भारतीय नोट चालत असल्याने रात्रीपासून हे कॅसिनो बंद आहेत.
नेपाळच्या कॅसिनोमध्ये १० टक्के लोक भारतीय लोक येतात. कॅसिनोमध्ये भारतीय नोटांचा अधिकाधिक वापर केला जातो. ५०० आणि १००० रुपयांबाबत मोदींनी घोषणा केल्यानंतर कॅसिनोच्या संचालकांनी अर्ध्या रात्रीच कॅसिनो बंद कऱण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, नव्या नोट चलनात येईपर्यंत कॅसिनो बंद ठेवावा लागेल असे तेथील कॅसिनो संचालकांचे म्हणणे आहे.