'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'

लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय. 

Updated: Feb 11, 2016, 05:14 PM IST
'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'

लंडन : लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय. 

संकुचित अशा हिंदू राष्ट्रवादाविरुद्ध उभं राहण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं राजन यांनी म्हटलंय. बॉम्बे एक खुला केंद्रबिंदू असून सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या बंदराचे शहर आहे. तसेच, जगासाठी गेट वे ऑफ इंडिया खुले आहे, असे अमोल राजन यांनी म्हटले आहे.

मुंबईत बहुभाषिक मराठी लोकसंख्या असल्याने त्यांच्या बोलीभाषेतून मुंबई असा शहराचा उल्लेख अनेकदा येत असल्याने शिवसेनेनं ब्रिटीशांनी ठेवलेल्या 'बॉम्बे'ला विरोध केला. त्यानंतर १९९५ पासून बॉम्बेचा सर्व स्तरावर 'बॉम्बे'ऐवजी 'मुंबई' असा उल्लेख करण्यात येवू लागला. 

शिवसेनेनं मुंबई हे नाव 'मुंबादेवी'वरून ठेवलं होतं. मुंबईदेवी सर्वांत अगोदरपासून स्थानिक मच्छिमारांची रक्षक म्हणून ओळखली जाते.