अफगाणिस्तानात सरकारी वाहिनीच्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय वाहिनीच्या जलालाबादमधल्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला झालाय. यामध्ये किमान 10 जण ठार झाले असून यात वाहिनीचे 4 कर्मचाऱी आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं रुग्णालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय. 

Updated: May 17, 2017, 11:28 PM IST
अफगाणिस्तानात सरकारी वाहिनीच्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला title=

काबूल : अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय वाहिनीच्या जलालाबादमधल्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला झालाय. यामध्ये किमान 10 जण ठार झाले असून यात वाहिनीचे 4 कर्मचाऱी आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं रुग्णालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय. 

किमान 24 जण हल्ल्यात जखमी झाले असून चारही हल्लेखोरही मारले गेल्याचा दावा अफगाणी गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यानं केलाय. आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये. 

जलालाबाद राजधानी असलेल्या नगरहार या प्रदेशामध्ये तालिबान आणि आयसिस या दोन्ही अतिरेकी संघटना कार्यरत आहेत.