पाकिस्तानात स्फोट, ८ ठार

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एका शिया जुलूस यात्रेदरम्यान झालेल्या स्फोटात कमीत कमी आठ जण ठार झाल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार आज दुपारी खानपूर शहरात चहल्लुम मध्ये शिया पंथींयांच्या जुलूस यात्रा इमामवाडा येथून निघताच हा स्फोट झाला.

Updated: Jan 16, 2012, 12:01 AM IST

www.24taas.com, लाहोर

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एका शिया जुलूस यात्रेदरम्यान झालेल्या स्फोटात कमीत कमी आठ जण ठार झाल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार आज दुपारी खानपूर शहरात चहल्लुम मध्ये शिया पंथींयांच्या जुलूस यात्रा इमामवाडा येथून निघताच हा स्फोट झाला.

प्रत्यक्षदर्शी आणि सुत्रांच्यानुसार स्फोटाच्या ठिकाणी कमीत कमी आठ मृतदेह होते तर जवळजवळ १२ लोक जखमी होते. तर या जुलूस यात्रेमध्ये १५० लोक सहभागी झाले होते. तेथील पोलीस प्रमुख जहीर आबिद कादरी यांच्या म्हणण्यानुसार या यात्रेतील घेऊन जाणाऱ्या पताकाच्या लोखंडी काठीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने हा अपघात झाला आहे.

तसचं कादरीने सांगितले  की, या स्फोटाच्या ट्रांसफॉर्मर मध्येही स्फोट झाला. तसचं त्यांनी किती जण ठार झाले आहेत याची कोणतीच खात्रीलायक माहिती दिली नाहीये..