कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ

प्रसिद्ध मानसरोवर यात्रेला शनिवारपासून सुरूवात झालीय. ४७ भाविकांच्या पहिल्या गटानं आपल्या २८ दिवसांच्या यात्रेला सुरूवात केलीय.

Updated: Jun 3, 2012, 12:25 PM IST

 www.24taas.com, नैनीताल 

 

प्रसिद्ध मानसरोवर यात्रेला शनिवारपासून सुरूवात झालीय. ४७ भाविकांच्या पहिल्या गटानं आपल्या २८ दिवसांच्या यात्रेला सुरूवात केलीय.

 

भाविकांच्या या पहिल्या गटात दिल्लीच्या सहा महिलांचाही समावेश आहे. पिथरौगड जिल्ह्यातल्या चोकरीमध्ये हा गट शनिवारी दाखल झाला. या यात्रेचं व्यपस्थापन ‘नोडल एजन्सी कुमाऊ मंडळ विकास निगम’कडे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी असे १६ गट कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना होणार आहेत. ४७ जणांच्या भाविकांच्या पहिल्या गटात महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या १४ राज्यांतील भाविकांचा समावेश आहे. यातले सर्वात जास्त भाविक म्हणजेच १३ जण दिल्लीतून आहेत. यात्रेदरम्यान, हे भाविक समुद्रतळापासून १५,०६० फूट उंचीवर असणाऱ्या मानसरोवरची परिक्रमा करणार आहेत.