केंद्र सरकारची महागाई भत्त्यात वाढ

लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचे ठरवले आहे. महागाई भत्त्यात १० टक्कांची वाढ होणार आहे.

Updated: Mar 1, 2014, 10:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचे ठरवले आहे. महागाई भत्त्यात १० टक्कांची वाढ होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ते ९० टक्क्यांवरुन १०० टक्के होणार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये महागाई भत्ते ८० टक्क्यांवरुन ९० टक्के करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या अन्य प्रस्तावात कर्मचारी भविष्य निधी योजनतील (ईपीएफओ) पेंशन योजना किमान रक्कम १ हजार रुपये प्रती महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने उमेदवार निवडणूक खर्च वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.