Soap Price Increased: आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, 'या' साबणांच्या किमती वाढणार

Soap Price Increased: साबण बनवण्याच्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी प्रमुख व्यापाऱ्यांनी किमतीत सुमारे सात-आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 30, 2024, 07:48 AM IST
Soap Price Increased: आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, 'या' साबणांच्या किमती वाढणार  title=
Photo Credit: Freepik

Soap Price: देशात महागाई वाढतच आहे. देशातील वाढत्या महागाईचा परिणाम आता अगदी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरही होताना दिसत आहे. फक्त खाण्याच्याच वस्तू नाही तर आता रोजच्या वापराच्या इतर वस्तूही महाग होऊ लागल्या आहेत. पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने आता साबणाचे भाव वाढले आहेत. एका अहवालानुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि विप्रो सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी पाम तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम कमी करण्यासाठी साबणाच्या किमतीत सुमारे सात ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

पाम तेल आहे मुख्य उत्पादन 

पाम तेल हे साबण बनवण्यासाठीचे प्रमुख कच्चा माल आहे. अनियमित हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याने HUL आणि Tata Consumer सारख्या कंपन्यांनीही अलीकडे चहाच्या किमती वाढवल्या आहेत. आता चालू तिमाहीत साबणाच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोको यासारख्या वस्तूंच्या वाढत्या किमतीचा सामना करावा लागत होता. यामुळेच आता याचा बाकीच्या किंमती वाढल्या आहेत. 

हे ही वाचा: भारतात 'इथे' फक्त 200 रुपयात मिळते हिऱ्याची खाण, मजूरही बनू शकतो करोडपती

7-8 टक्के होणार भाव वाढ

एजन्सीशी बोलताना, विप्रो कंझ्युमर केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नीरज खत्री म्हणाले, "साबण बनवण्याच्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 30 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. परिणामी सर्व प्रमुख व्यापाऱ्यांनी या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी सुमारे सात-आठ टक्क्यांनी भाव वाढवले ​​आहेत. आमची किंमत या बाजारातील ट्रेंडशी सुसंगत आहेत."  अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वावाली  विप्रो एंटरप्रायझेसच्या विप्रोकडे संतूर सारखे ब्रँड आहेत.  

हे ही वाचा: भारतातील या मंदिरांमध्ये करतात 'खलनायकांची' पूजा! जाणून घ्या तुम्ही कसे पोहोचू शकाल

पाम तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ

आघाडीची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने देखील चहा आणि त्वचा साफ करणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये डव, लक्स, लाइफबॉय, लिरिल, पीयर्स, रेक्सोना  (Dove, Lux, Lifebuoy, Liril, Pierce, Rexona)  इत्यादी ब्रँड आहेत. 

हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ

पाम तेल कुटून आयात केले जाते? 

जागतिक किमतीत वाढ आणि आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापासून पामतेलाच्या किमतीत सुमारे 35-40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाते. सध्या पामतेलाचा भाव सुमारे 1,370 रुपये प्रति 10 किलो आहे.