पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू कोण? जाणून घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ सप्टेंबरला आपल्या गुरूंना भेटायला जाणार आहे. आजारी असलेले गुरू स्वामी दयानंद गिरी यांना भेटण्यासाठी मोदी ऋषिकेशला जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर उत्तराखंडला त्यांची ही पहिली यात्रा असेल. 

Updated: Sep 10, 2015, 04:23 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू कोण? जाणून घ्या! title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ सप्टेंबरला आपल्या गुरूंना भेटायला जाणार आहे. आजारी असलेले गुरू स्वामी दयानंद गिरी यांना भेटण्यासाठी मोदी ऋषिकेशला जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर उत्तराखंडला त्यांची ही पहिली यात्रा असेल. 

पंतप्रधांनाच्या दौऱ्यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी केलीय. ११ सप्टेंबरला नरेंद्र मोदी ऋषिकेशच्या शीशमझाडी इथं असलेल्या दयानंद आश्रमला भेट देतील. यानंतर पीएम मोदी गंगेच्या तिरावर ध्यान पण लावणार आहे. 

स्वामी दयानंद यांचा नरेंद्र मोदींच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असल्याचं सांगण्यात येतं, ते आपल्या गुरूला भेटण्यासाठी, गुरूसेवेसाठी नेहमीच तत्पर असतात.

आणखी वाचा - कर्णधार मोदींनी पहिल्याच कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकलं

स्वामी दयानंद गिरि ऋषिकेशच्या स्वामी दयानंद सरस्वती आश्रम आणि कोयंबतूरमध्ये अर्श विद्या गुरुकुलममध्ये शिक्षक आहे. स्वामी दयानंद गिरी शंकर परंपरेचे वेदांत आणि संस्कृतचे शिक्षक आहे. त्यांनी ५० वर्षात देशातील आणि परदेशातील अनेकांना वेदाचं शिक्षण दिलंय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्तावाचंही कौतुक केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.