कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी

सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत. 

Updated: May 12, 2015, 10:22 AM IST
कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी title=

कोलकाता : सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत. 

पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आर. एन. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३.२० वाजता सियालदाह स्टेशनहून निघालेली रेल्वे ३.५५ वाजता टीटागडला पोहचली. 

यावेळी, टीटागडला एक व्यक्ती ट्रेनमध्ये घुसला त्यानंतर लगेचच या रेल्वेत स्फोट झाला. प्राथमिकदृष्ट्या हा एक क्रूड बॉम्बस्फोट असल्याचं समजतंय. 

२५ पैंकी सात जणांना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आलीय. इतर जखमींना जवळच्याच एका हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. 

दरम्यान, सियालदाह मुख्य खंडात रेल्वे सेवा सुरळीत सुरु झालीय. रेल्वे पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, मार्च महिन्यात बिरभूम जिल्ह्यातील नानूर या गावात जवळपास २५० क्रूड बॉम्ब हस्तगत करण्यात आले होते. या प्रकरणात दोन जणांना अटकही करण्यात आली होती.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.