लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2012, 07:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते. तर तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव विरोध केला होता. त्यामुळे FDI काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
लोकसभेत काल मंगळवारी FDI रिटेलवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. काल विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्याने कामकाजात व्यत्यय आला. त्याआधी जोरदार हंगामा केल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. आज बुधवारी FDIवर महाचर्चा घडवून आणली गेली. यावेळी भाजपने जोरदार हरकत घेतली. तर जेडीयुचे शरद यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या सूरात सूर राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही सूर मिळविला. यावेळी सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर FDIवर मतदान घेण्याचे ठरले. सायंकाळी सहा वाजता मतदानाला सुरूवात झाली. यावेळी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांनी सभागृहातून वॉकआऊट केले. त्यामुळे त्यांनीच युपीए सरकार वाचविल्याचे दिसून आले आहे.
FDI बाबत लोकसभेत महाचर्चेच्यावेळी भाजपांने जोरदार विरोध करत FDI विरोधात प्रस्ताव दाखल केला मात्र, सरकारने हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यानंतर झालेल्या मतदानात २५३ विरोधात २१८ मतं युपीए सरकारला मिळालीत. त्यामुळे केंद्र सरकारचा रिटेल FDIचा मार्ग मोकळा झाला. त्यातच ४३ सदस्यांनी सभात्याग केल्याने विरोधकांच्या २३९ मतांपैकी युपीए सरकारविरोधात २१८ मतं पडलीत. यामुळे केंद्र सरकारचा रिटेल FDIचा मार्ग मोकळा आणि लोकसभेत एफडीआयला मंजुरी मिळाली.