नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायाधीश यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे जज कुरिअन जोसेफ यांनी याला नकार दिला.
गुडफ्रायडे असल्यामुळे मी असा कार्यक्रमात सहभागी होत नाही, अशी त्यांनी माहिती दिली.याआधी न्यायाधीशांच्या तीन दिवसीय संमेलन ईसाइंच्या या पवित्र दिवसांत ठेवल्याबद्दलही चीफ जस्टिस एच एल दत्तू यांच्या समक्ष हरकत घेतली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या बैठकीच्या आयोजनावर प्रश्न उपस्थीत केला होता.
शनिवारी रात्री होणाऱ्या भोजन समारंभात आमंत्रित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानलेत. जस्टिस जोसेफ यांनी पत्रात लिहीलं आहे की, मी या समारंभात सहभागी होऊ शकत नाही कारण, हा कार्यक्रम गुड फ्रायडे दरम्यान आहे. गुड फ्रायडेमध्ये आम्ही आमच्या कुटुंबासमवेत एकत्र येतो. ही आमची परंपरा आहे. तसेच गुडफ्रायडेचं आमच्या जीवनात वेगळं धार्मिक महत्व आहे. त्यामुळे मी काळात केरळमध्ये असणार आहे.
दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद, ख्रिसमस, ईस्टर हे आपल्या आयुष्यातील महत्वाचे दिवस असतात. त्यामुळे यादिवसांत कोणत्याही कार्यालयीन कामांचं आयोजन करु नये. तसेच त्यांनी काही ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. जगभरात त्रास, अवहेलना सहन करुन यहूदी आणि पारसी जेव्हा भारतात आले तेव्हा भारतात शासनकर्त्यांकडून त्यांना भरपूर सन्मान मिळाला, असेही त्यांनी पत्रात लिहीले.
जस्टिस जोसेफ यांनी पुढे लिहिले की, मला माहीत आहे की खूप उशीर झाल्यामुळे कार्यक्रमात बदल करणे शक्य नव्हते. मात्र पुढे अशा कार्यक्रमाचे आयोजन करतांना अशा धार्मिक महत्व असणाऱ्या दिवसात होणार नाही याची काळजी घेतली जावी. चिफ जस्टिस यांनी जोसेफ यांना उत्तरादाखल लिहीलेल्या पत्रात न्यायाधीशांनी स्वत:लाच प्रश्न विचारला पाहीजे की आपलं कर्तव्य आणि व्यक्तीगत जीवन यात कशाला महत्व दिलं पाहीजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.