अगरतळा : त्रिपुरा पोलिसांनी आणखी एक सेक्स रॅकेट उघड केलं आहे, सर्वात जास्त गंभीर बाब म्हणजे, यात सेक्स रॅकेटमध्ये मेडिकलच्या विद्यार्थींनींचाही समावेश आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३४ लोकांमध्ये २० विद्यार्थीनी आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं, आम्हाला सूचना मिळाल्यानंतर रविवारी रात्री पोलिसांनी अगरतला जवळील तीन रेस्टॉरंटवर छापा मारून ३४ लोकांना अटक केली, अटक करण्यात आलेल्यांमध्ये जास्तच जास्त विद्यार्थींनी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात अगरतळाच्या नॅशनल इस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अगरतळा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग इन्स्टीट्यूटच्याही काही विद्यार्थीनी आहेत, यातील दोन मुली १७ वर्षांच्या आहेत.
पोलिसांनी रेस्टॉरंट मालकानाही अटक केली आहे, कोर्टाने ३२ लोकांना न्यायालयीने कोठडी सुनावली आहे, तर दोन मुलींचं वय १७ वर्ष असल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.