दिल्लीत १ ते १५ जानेवारीदरम्यान शाळा बंद राहणार?

दिल्ली सरकार एक ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कालावधीदरम्यान राजधानी दिल्लीत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाणार आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली जाईल. 

Updated: Dec 12, 2015, 09:11 AM IST
दिल्लीत १ ते १५ जानेवारीदरम्यान शाळा बंद राहणार?

नवी दिल्ली : दिल्ली सरकार एक ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कालावधीदरम्यान राजधानी दिल्लीत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाणार आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली जाईल. 

राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका मुलांना आहे. त्यामुळे वाहनांबाबतची समविषम वाहना फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाईल. 

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी असते. त्यामुळे जर एक ते १५ जानेवारीपर्यंत सुट्टींची घोषणा केल्यास मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होणार नाही, असे दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.