श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यातील एका बँकेला चार बंदूकधाऱ्यांनी लुटले. बॅंकेतून जवळपास 11 लाख रुपये लुटल्याची घटना आज घडली.
जम्मू आणि काश्मीर बँकेची रत्नीपोरा येथे शाखा आहे. या बँकेमध्ये चार बंदूकधाऱ्यांनी प्रवेश केला आणि दहशत पसरवली. त्याचवेळी त्यांनी कॅशिअरच्या डोक्याला बंदूक लावली. बँकेत असलेली 11 लाख रुपयांची रक्कम घेत पोबारा केला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. पोलीस तपास करीत आहेत.