तिरुअनंतपुरम : केरळमध्ये होणारं एक लग्न भलतंच चर्चेत आहे... केरळचे उद्योगपती बी. रवी. पुजारी यांची कन्या आरती हिच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या केवळ मंडपासाठीच २० करोडोंचा खर्च करण्यात आलाय. तर संपूर्ण लग्नासाठी जवळपास ५५ करोड रुपयांचा चुराडा करण्यात आला.
पुजारी हे केरळचे खूप मोठे उद्द्योगपती व बांधकाम व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या २६ कंपन्यांत जवळपास एकुण ८० हजार कर्मचारी काम करतात. पुजारी यांची एकूण संपत्ती ही २ हजार करोडोंच्या घरात आहे. त्यांची कन्या आरती पिल्लईचा विवाह कोच्चीमधील डॉ. आदित्य विष्णू यांच्या सोबत पार पडला.
आरतीच्या लग्नासाठी 'बाहुबली' चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर साबू सायरिल यांनी हा मंडप तयार केला होता. त्यांच्यासोबत २०० कामगार हा राजस्थानी महाल तयार केलाय. विवाहा सोहळ्यासाठी ३० हजार लोक सहभागी झालेत. लग्नाचं रिसेप्शन २८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. यामध्ये अनेक कलाकार, नेते, सरकारी अधिकारी असे देश-विदेशांतील अनेक महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. युएईचे भारतातील राजदूत टी पी सीतारमण, कत्तारच्या राजघराण्यातील शेख हमद बिन खालिए एचए अल थानी, सऊदी अरबच्या राजघराण्यातील परिवार यासारख्या नांमाकित व्यक्तीही या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्यात मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री मंजू वारियर , शोभना यांच्या नृत्याचा आणि स्टीफन यांचा संगीतचा कार्यक्रमही होणार आहे.
आरतीच्या साखरपुड्याचा हा व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.